आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:पर्यटकास 12 लाख रुपयांची भरपाई द्या; रिसाॅर्टमालकाला न्यायालयाचा आदेश

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिसाॅर्ट कम अॅडव्हेंचर पार्कमध्ये साहसी खेळामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी न घेता झीप लाईन राईड करतांना महिला पर्यटक २५ फूट उंचीवरुन पडल्याने गंभीर जखमी झाली. ग्राहकाला रिसोर्टकडून कुठल्याही सुविधा मिळाल्या नसल्याने त्याने ग्राहक न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाने रेनफाॅरेस्ट रिसाॅर्ट अँड स्पाचे अवतार सिंह सेठी (रा. बलायदुरी, इगतपुरी) यांना पर्यटकाच्या उपचाराचा खर्च १२ लाख ३२ हजार आणि शारीरीक व मानसिक त्रासपोटी १ लाख ५० हजारे देण्याचे आदेश दिले.

ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिद्धी पारख (रा. जुना गंगापुरनाका) यांनी ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता. बहिण कृती पटेल यांनी अॅक्टिव्हीटीज अॅडव्हेंचर पार्क येथे २९ डिसेंबर २०१९ रोजी एक दिवसाची सात लोकांची बुकींग केली होती. पार्कमध्ये झीप लाईन राईड करताना प्रशिक्षकाने हार्नेस लावले व राईड करता केबलला हुकने लटकवले. राईड सुरक्षेसाठी हेल्मेट कॅप दिलेली नव्हती. तसेच बेल्टे निट बांधला का, असे विचारले असता प्रशिक्षकाने होय सांगितले.

२० ते २५ फुट उंच गेल्यानंतर बेल्ट तुटल्याने पटेल जमीनीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्यास व पाठीला गंभीर मार बसला. घटनेनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी कारने नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले. घटना घडल्यानंतर रिसोर्टकडून कुठलीही मदत झाली नाही. शस्त्रक्रियेसाठी मुंबईला नेण्यात आले. सुमारे ११ लाख रुपये खर्च आला. रिसोर्ट व्यवस्थापनाने पैसे घेऊन ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, अशी तक्रार दिली होती. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी रिसोर्टमालकाला ग्राहक कायद्यांतर्गत ग्राहकाला १२ लाख २ हजार ९२६ रुपये आणि शारीरी व मानसिक त्रासापोटी १ लाख ५० हजार तसेच तक्रार अर्जाचा खर्च २५ हजार देण्याचे आदेश दिले. तक्रारदारांच्या वतीने अॅड. सुमेघा कुलकर्णी यांनी तर रिसोर्ट प्रशासनाच्या वतीने अॅड. जे. एन. शिंदे यांनी कामकाज पाहिले.

२५ फूट उंचीवर बेल्ट निघाला
२९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ५ दरम्यान अॅडव्हेंचर पार्कमध्ये महिला पर्यटक झीप लाइन राईड करत असताना डोक्यात हेल्मेट नव्हते. संबंधित प्रशिक्षकाने सुरक्षा बेल्ट व्यवस्थित बांधला नव्हता. दीड फूट अंतर पार केल्यानंतर २५ फूट उंचीवर गेल्यानंतर बेल्ट निघाल्याने त्या जमिनीवर पडल्या. दहा दिवस नाशिकच्या रुग्णालयात उपचार घेतले. दुसऱ्या शस्त्रक्रियासाठी मुंबईत दाखल झाले. त्यांना चालता येत नसल्याने नोकरीही गमावली आहे.

बातम्या आणखी आहेत...