आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूजल पातळी:पे. द. सुराणा महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समाराेप, शिबिरात विविध उपक्रम

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीमान पे. द. सुराणा कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील एन. एस. एस. विभागातर्फे तालुक्यातील वडबारे येथे आयोजित हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप झाला. शिबिरात भूजल पातळी वाढण्यासाठी स्वयंसेवकांनी वडबारे डोंगरावर चर खोदले, महामार्ग ते इच्छापूर्ती गणेश मंदिर या रस्त्याच्या साइडपट्टीवर मुरुम टाकला, वडबारे गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर परिसरात स्वच्छता केली, वीटभट्टीवरील मुलांचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

वडबारे येथे वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांना चर खोदून दिले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी होते. प्रास्ताविक एन.एस.एस. अधिकारी पी. एम. जाधव यांनी केले. बापूसाहेब आहेर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शनपर भाषणात स्वयंसेवक ते जनसेवक बना, असे आवाहन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य यू. के. जाधव यांनी मार्गदर्शन करताना श्रमसंस्कार शिबिरात मिळालेले संस्कार आचरणात आणण्याचे आवाहन केले.

स्वयंसेवकांच्या बौद्धिक विकासासाठी व संस्कारासाठी शिबिरातील सहा दिवसांत आनंदी जीवन, योगा प्राणायाम, अध्यात्म आणि जीवन अशा विविध विषयांवर व्याख्यानांचा स्वयंसेवकांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन जी. आर. गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी ग्रामसेवक प्रवीण देशमुख, भिका विठ्ठल जाधव, श्रीमती मीनाबाई जाधव, राजेंद्र शर्मा, पुंडलिक सोनजे, डॉ. मनोज पाटील, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संदेश बुरड, पी. व्ही. ठाकूर, सरपंच ताईबाई आहेर, श्रीमती संगीता जाधव, दीपक जाधव, ज्येष्ठ प्रा. व्ही. डी. बागूल, एस. जी. रोकडे, वाय. एस. पाटील आदी उपस्थित हाेेते.

बातम्या आणखी आहेत...