आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले:जनतेला चांगली घरे मिळाली पाहिजेत, हेच सरकारचेही स्वप्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना चांगली घरे मिळाली पाहिजे, हे राज्य सरकारचेदेखील स्वप्न असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचेदेखील सर्वांना हक्काचे घर मिळावे, याकरिताच प्रत्येक योजनांचा अनुभव अपण घेतला आहे. राज्यात आता अमृत महाआवास याेजना सुरू झाली असून सर्वांसाठी घर ही त्यामागची संकल्पना आहे.

क्रेडाई मेट्राे नाशिकच्यावतीने डाेंगरे वसतीगृह मैदानावर आयाेजित ‘शेल्टर २०२२’ या प्राॅपर्टी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे दृकश्राव्य माध्यमाव्दारे मार्गदर्शन करत हाेते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गाेडसे, महापालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाइ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फरदे, सेक्रेटरी सुनील काेतवाल, क्रेडाइ नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष क्रृणाल पाटील, गाैरव ठक्कर आदी उपस्थित हाेते.

नियाेजनबद्ध विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणार
नाशिकचा नियाेजनबद्ध विकास व्हावा, याकरिता नियाेजनबद्ध आराखडा तयार करून महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या पातळीवरील विषय साेडवण्यासाठी एकत्रितपणे काम केले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकास आराखड्यावर काम सुरू झाले असून क्रेडाईलाही शहराच्या विकासात माेलाचे याेगदान असल्याने सहभागी करून घेणार असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

बाह्य रिंगराेडसाठी बैठकीत चर्चा : खा. हेमंत गाेडसे
शहराच्य विकासात रिंगराेडचे महत्त्व असून आगामी कुंभमेळा लक्षात घेता ही रिंगराेड निर्माण व्हावेत, याकरिता शेतकऱ्यांना पाच टीडीआर दिला जावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून या रींगराेडमुळे शहराच्या विकासाला गती येणार आहे. विमानसेवेसह दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध असल्याने नाशिकचा विकास काेणी राेखू शकत नाही असे खा. हेमंत गाेडसे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...