आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या अर्पण रक्तपेढीचा शासनाकडून सन्मान:राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन केले; जागतिक रक्तदान दिनानिमित्त गौरव

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तदानाच्या क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या आराेग्य विभागाकडून नाशिकच्या अर्पण रक्तपेढीचा मंगळवारी सन्मान करण्यात आला.

मुंबई विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जागतिक रक्तदान दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह येथे गौरव करण्यात आला.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल नार्वेकर,खासदार अरविंद सावंत, रक्त संक्रमण परिषद डॉ. प्रदीप व्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान डॉ. रामास्वामी एन. डाॅ. साधना तायडे, डॉ. अरुण थोरात यांच्या हस्ते रक्तपेढीचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी टाेपे म्हणाले की, अर्पण रक्तपेढीने थॅलेसेमियाग्रस्त मुलांना 12 वर्षापासून नॅट टेस्टेड रक्त म्हणजे जगातील अतिसुरक्षित रक्त 0% धोका नसलेले रक्त देऊन मुलांना रक्तसंक्रमाणाद्वारे होणाऱ्या एच.आय. व्ही. व कावीळ या सारख्या दुर्गम आजारांचे प्रमाण शून्य टक्के केले. या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांचे जीवन सुसज्य होत आहे.

अर्पणनेने सामाजिक बांधिलकी जोपासत नैतिक जबाबदारी पूर्ण केल्याचे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. अर्पणने मार्फत आतापर्यंत 30 हजार 410 नॅट टेस्टेड रक्तपिशव्या थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला. 571 थॅलेसेमिया जनजागृती कॅम्प घेऊन 54 हजार 250 थॅलेसेमिया चाचणी केले , त्यातून 815 थॅलेसेमिया मायनर आढळून आले असून त्यांचे समूपदेशन सोसायटीमार्फत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...