आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Permission Of Tree Authority Committee In The Area; MP's Son Godse Along With Tajanpure Filed In Illegal Tree Felling Case |marathi News

गुन्हेगारी:परिसरात वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी; अवैध वृक्षतोडप्रकरणी खासदारपुत्र गोडसेसह ताजनपुरेवर गुन्हा दाखल

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र.१९ मधील देवळाली शिवारातील सर्व्हे न.१९३-२० ब,न्यू बालाजी हॉटेल ढाब्याशेजारी असलेल्या खर्जुल मळा परिसरात वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेताच सात वृक्ष तोडल्याप्रकरणी अखेरीस नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य व योगेश ताजनपुरे यांच्याविरोधात राजकीय दबाव झुगारून कारवाई केल्यामुळे कारवाईचे स्वागत होत आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आले.

शासकीय नियम धाब्यावर बसवत खर्जुल मळे परिसरात वृक्षतड केल्यामुळे नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली. पालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड थांबवून ट्रकसह साहित्य जप्त केले आहे.तसेच गोडसे आणि ताजनपुरे यांना अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी चार लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नाशिकरोड पोलिसांना पत्र दिले होते मात्र कारवाई होत नव्हती. अखेरीस पालिकेचे उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर गोडसे व ताजनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मनपा पथक नोटीस देण्यासाठी गेल्यानंतर गोडसे यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उद्यान विभागाने पोलिसांकडे पाठपुरावा करत गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...