आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Permissions Now Only After Payment Of House Rent, Water Rent Arrears; As The Arrears Have Gone Up To 500 Crores, The Commissioner's Order| Marathi News

आदेश:घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी भरल्यानंतरच आता परवानग्या; थकबाकी ५०० काेटींवर गेल्याने आयुक्तांचा आदेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा हा पाचशे कोटींवर पोहाेचल्याने थकबाकी वसुलीसाठी आता पालिकेकडून विविध परवानग्या व प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना प्रथम थकबाकी भरण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

पालिकेच्या विविध थकबाकी संदर्भात आयुक्तांनी शनिवारी खातेप्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत वरील आदेश दिले. पालिकेकडून नवीन बांधकाम, बांधकाम दुरुस्ती, नळजोडणी, मंडप उभारणी, वृक्षतोड यासह विविध प्ररकारच्या परवानग्या दिल्या जातात. खासगी रुग्णालये, क्लिनिकसाठी परवाना नोंदणी आणि नूतनीकरण, वास्तुशिवारद परवानगी प्रमाणपत्र, अग्निशमन दाखला, विविध प्रकारचे दाखले, ना हरकत दाखले महापालिकेच्या विविध विभागांकडून अर्जदारांना उपलब्ध करून दिले जातात. अशाप्रकारच्या परवानग्या, प्रमाणपत्र, ना हरकत दाखले देण्यापूर्वी आता संबंधितांनी थकीत करांचा भरणा करण्याचे निर्देश आयुक्तयांनी दिले.

घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विविध उपाययाेजना पालिकेकडून करण्यात आल्या हाेत्या. त्यात घरपट्टी मुदतीआधी भरल्यास सवलतही देण्यात आली हाेती. पालिकेने यासाठी अॅपची सुविधाही दिली हाेती. तरीही थकबाकी वसूल हाेत नसल्याने पालिका आयुक्तांनी अॅक्शन माेडवर येत अधिकाऱी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

कर्मचारीही रडारवर
पाचशे कोटीच्या थकबाकीच्या आकड्यात बड्या थकबाकींदारासोबतच पालिकेचे अनेक कर्मचारी व अधिकारी देखील आहेत. थकीत करांची रक्कम तातडीने भरण्याचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करांची रक्कम भरली आहे की नाही याची व्यक्तीश: तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत.

शंभर टक्के वसुली करणाऱ्यांचा गौरव
वसुली विभागातील विभागनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करवसुलीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या वर्धापनदिनी गौरव करण्याचा निर्णय डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला आहे. त्याबरोबर जे वसुली कर्मचारी उद्दिष्टपूर्ती करण्यात अपयशी ठरतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...