आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतांचे आचरण हे जगन्मातेच्या रूपात भक्तास पहावयास मिळते व त्याची प्रचिती मी संत साळीबाबांच्या सहवासात अनुभवली आहे. असे प्रतिपादन उत्तममहाराज चव्हाण यांनी केले. सिडकोतील जिव्हेश्वर जन्मोत्सव प्रवचनमालेत ते बोलत होते.
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले की, संत साळीबाबांचे बोलणे हे अत्यंत मधूर होते. ते लौकिकदृष्ट्या जरी अल्पशिक्षित असले तरी त्यांची माता, गुरू केरोबा महाराज व गाडगे महाराजांसारख्या सत्पुरुषांच्या सत्संगाने त्यांच्या विचार व आचरणाची पातळी अत्यंत उच्चतम होती. एकवेळ अर्धपोटी रहावे लागले तरी रहा पण आपल्या मुलामुलींना उच्च शिक्षित, सुसंस्कृत व मानवतावादी अवश्य बनवा! अशा विचारांची पेरणी संत साळीबाबा आपल्या प्रवचन-कीर्तनातून नियमित करीत असत. असेही पुढे चव्हाण यांनी श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव, सिडको, नाशिक आयोजित प्रवचन मालेत प्रथम पुष्प गुंफताना सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.