आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलतिकीट:पेटचे हॉलतिकीट वेबसाइटवर उपलब्ध; 6 नोव्हेंबरला परीक्षा, 10 रोजी निकाल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी पीएच.डी. प्रवेश परीक्षा आणि १० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. विद्यापीठ विभाग, संलग्न महाविद्यालय आणि संशोधन केंद्रांमध्ये पीएच.डी.ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षेचे (पेट) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत. विद्यापीठाच्या वेबसाइटवरील प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉगिन वर हे हॉलतिकीट उपलब्ध केल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा अनेक नवीन मार्गदर्शकांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तुलनेत यावेळी अधिक संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या प्रवेशासाठी विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी (पेट )विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली आहे.

जवळपास ३८०० जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. दरवर्षी साधारण दहा हजाराने अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात, त्यापैकी तीन हजार विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळतो. यंदा प्रवेश क्षमता वाढल्याने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल. १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...