आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमधून नाशिकच्या वेशीत शिरल्यानंतर साडेसहा किमीच्या खड्ड्यातून जाणाऱ्या पेठराेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्तीसाठी महापालिकेने २ काेटी २९ लाख रुपयांचा प्रस्ताव महासभेवर सादर केला आहे. त्यातून खड्डे पडलेल्या भागात डांबराचे पॅच मारले जाणार आहेत. दरम्यान, संपूर्ण रस्त्याच्या क्राॅकिटीकरणासाठी ७१ काेटींची गरज असून अत्यंत गंभीर विषय असताना पालिकेने तसेच शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राऊ हाॅटेलपासून तर पुढे तवली फाट्यापर्यंत पेठराेडची दुरवस्था आहे. गुजरातच्या हद्दीपर्यंत खूप चांगला रस्ता, मात्र नाशिक वेशीत प्रवेश करताच खड्डे अशी अवस्था आहे. स्थानिक नागरिकांनी पेठराेड दुरुस्तीसाठी आंदाेलन केले हाेते. दुसरीकडे, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला हाेता तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडेही मागणी करूनही जिल्हा नियाेजन समितीकडून दाद दिली गेली नाही.
तत्काळ जे शक्य ते करा
हाॅटेल राऊ ते नाशिकची हद्दीपर्यंतचा पेठराेड दुरूस्तीसाठी तत्काळ जे शक्य ते करा अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी राज्य, स्मार्टसिटी , नियाेजन समितीकडे निधी मागितला आहे. पालिकेने स्वनिधीतून डिसेंबरमधील सुधारीत अंदाजपत्रकात निधी देण्यास अडचण नाही. - अॅड. राहुल ढिकले, आमदार,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.