आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरक, पंपमालकांना कंपन्यांकडून ब्रॅण्डेड पेट्राेल खरेदीची सक्ती:सामान्यांना आर्थिक झळ; दरातील फरकामुळे पंपांवर ग्राहकांकडून वाद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल कंपन्यांकडून पेट्राेल पंप चालकांना, वितरकांना ब्रॅण्डेड पेट्राेल खरेदीची सक्ती केली जात असून यासाठी काेटा मान्य केला तरच अपेक्षीत पेट्राेल-डिझेल मिळत आहे. यामुळे मात्र पंपचालकांना ब्रॅण्डेड पेट्राेल खरेदी करून त्याची विक्री करावी लागत असून हे पेट्राेल लिटरमागे 6 रूपयांनी महागडे असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसताे आहे. यातूनच महागडे पेट्राेल भरले म्हणून पंपावरील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाच्या घटनाही घडत आहेत.

भारत पेट्राेलियम कंपनीचे स्पीड पेट्राेल, इंडियन अाॅइलचे एक्स्ट्रा प्रिमियम पेट्राेल तर हिंदुस्थान पेट्राेलियमचे पाॅवर पेट्राेल या नावाने ब्र:ण्डेड पेट्राेलची विक्री हाेत असते. हे पेट्राेल शुध्द असल्याने त्याला एक स्वतंत्र ग्राहकही अाहे. मात्र, या पेट्राेलमध्ये जास्त कंपन्यांना मिळत असल्यानेच वितरकांना विशिष्ट काेटा खरेदी केला तरच साधे पेट्राेल-डिझेल मागणीनुसार काही प्रमुख कंपन्यांकडून दिले जात अाहे. याचा परीणाम पेट्राेलपंप चालकांनाही सहन करावा लागत असून नाइलाजाने त्यांना हे पेट्राेल गरजेपेक्षा जास्त खरेदी करावे लागत असून त्याच्या विक्रीसाठी काही ठिकाणी साधे पेट्राेलचे नाेझल बंद ठेवले जात अाहे. ग्राहकालाही अापण काेणते पेट्राेल टाकताे अाहे. हे नंतर कळाल्यानंतर ते वाद करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

------

सर्वाधिक इंधन विक्रीचे पंप टार्गेट (चाैकट)

शहरात 80 पंप असून यापैकी सर्वाधिक विक्री असलेले प्रमुख पंप इंडियन अाॅइल कंपनीचे अाहेत. या कंपनीकडूनही काेटा दिला जाताे ताे उचलला तरच अपेक्षीत पेट्राेल-डिझेल पुरविले जाते असे नाव न छापण्याच्या बाेलीवर एका वितरकाने सांगितले. यानंतर भारत पेट्राेलियम अाणि हिंदुस्थान पेट्राेलियमचा क्रमांक याबाबतीत लागताे असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------

पंपचालकांना बंधन नकाे (काेट)

पेट्राेलियम कंपन्यांकडून पेट्राे डिलर्सला काेटा देऊन ब्रॅण्डेड पेट्राेलची सक्ती करायला भाग पाडू नये अशी अपेक्षा अामच्या सदस्यांकडून व्यक्त हाेत अाहे. कारण, एकतर त्याची अडवणून यातून हाेत अाहे, शिवाय ग्राहकांशी कटकटी यामुळे वाढत अाहेत.

भुषण भाेसले, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रीक्ट पेट्राे डिलर्स असाेसिएशन

बातम्या आणखी आहेत...