आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळके स्मारक:फाळके स्मारक दोन दिवसांत खुले होणार, आयुक्तांचे आदेश ; पर्यटक सुखावले स्मारकातील कृत्रिम धबधबा अन् कारंजे सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२९ एकर जागेवरील फाळके स्मारकाची दुरवस्था थांबवण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर स्वनिधीतून फाळके स्मारकाच्या पुनर्विकास करण्यापूर्वी आहे त्या परिस्थितीत थोडीफार सुधारणा करून फाळके स्मारक येत्या दोन दिवसांत नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत १९९९ मध्ये महापालिकेने चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली होती. देखभाल-दुरुस्तीवरील खर्च वाढत गेल्यामुळे तसेच उत्पन्न घटू लागल्यामुळे प्रकल्पाची दुरवस्था झाली. या प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीवर आजवर साडेदहा कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प चालवण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये महापालिकेचे नुकसान होणार असल्याचे लक्षात आल्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत महापालिकेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प विकसित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकल्पातील किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात आली असून येत्या दोन दिवसांमध्ये स्मारक नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. स्मारकातील बहुचर्चित कृत्रिम धबधबा आणि कारंजे सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...