आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पीएच.डी. फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थी धडकणार नागपूरला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थी पीएच.डी. संशोधन अभिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपपासून वंचित आहेत. फेलोशिपअभावी या विद्यार्थ्यांचे पीएच. डी. मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहाण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांसमोर या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत फेलोशिप देण्याची मागणी केली.

त्याचा प्रस्ताव वित्त विभागाला गेल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतू अर्धे वर्ष संपूणही अद्याप विद्यार्थ्यांच्या हातीच काहीच लागत नसल्याने १५ डिसेंबरपर्यंत जाहीरात प्रसिध्द न केल्यास हे विद्यार्थी १९ नोव्हेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशातच धडकरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...