आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:सांघिक भावनेचे दर्शन; गुणवंत फुटबॉल खेळाडूंचा गौरव

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल खेळ हा अतिशय लोकप्रिय असून, त्यात सांघिक भावनेचे दर्शन घडते, किंबहुना सर्व एकसंघ राहिल्यास यश निश्चितच आपले असते. या खेळामुळे शारीरिक कसरतही चांगली होते. त्यामुळे या खेळात खेळाडूंनी प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

अमॅच्युअर फुटबॉल अकॅडमी, नाशिकरोडच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. धर्माधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिखरेवाडी मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस सुनील ढगे यांनी केले. कोविड महामारीमुळे दोन वर्षे हा कार्यक्रम करता आला नाही, असे ढगे यांनी सांगितले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. व्यासपीठावर माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, शैलेश ढगे, अंबादास पगारे, क्लब अध्यक्ष निवृत्ती चाफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात १५० गुणी खेळाडूंचा प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर राज्यपातळीवर निवड झालेल्या गौरी सोनवणे, श्रावणी गुरव, वैष्णवी पाटील आदींना पुरस्कार देण्यात आले. कोच कृतीक फौजी, गुणगुण यांना ही गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जाधव, राजू शहाणे, शिरीष खाडे, श्रीकांत पवार, प्रदीप बागूल आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन व आभार गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...