आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:माझी माय गोदामाय अंतर्गत उद्यापासून छायाचित्र प्रदर्शन

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्सतर्फे “माझी माय गोदामाय”या थीम अंतर्गत आयोजित छायाचित्र व चित्रकला स्पर्धेतील छायाचित्रे व चित्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात भरविण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १२) पालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीचे दोन्ही तट विकसित होत आहेत.या तटावरील विहंगम दृश्य लोकांसमोर मांडण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून ‘माझी माय गोदामाय’ अशी अभिनव छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली हाेती. या प्रदर्शनामुळे गोदावरीचे सौंदर्य लोकांसमोर तर येईलच परंतु तिच्या स्वच्छता व संवर्धनाने महत्त्वही लोकांना पटेल, असा विश्वास क्लबचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला.हे प्रदर्शन १२ आणि १३ नोव्हेंबर राेजी सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांना बघण्यासाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बेळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...