आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास हाेताे, असे प्रतिपादन डाॅ. अमित धांडे यांनी केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीमार्फत संस्थास्तरीय शिशुवृंद व प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. धांडे बाेलत हाेते. सकाळ सत्रात स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षपदी संस्था कार्यवाह राजेंद्र निकम तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. अमित धांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. क्रीडाज्योतीचे प्रज्वलन डॉ. अमित धांडे यांनी केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना उदावंत यांनी केले. व्यासपीठावर संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, डॉ अमित धांडे, क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी, क्रीडा समिती निमंत्रक राजेंद्र कापसे, संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, विजय मापारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सीडीओ मेरी हायस्कूलचे शिक्षक प्रतिनिधी दिलीप आहिरे उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपाली पाटील यांनी केले. शिशुवृंद उंटवाडीच्या मुख्याध्यापिका संगीता शुक्ल यांनी आभार मानले. महोत्सवात १००, २०० मीटर धावणे, शटल रन, बुक बॅलन्सिंग, मेडिसीन बॉल थ्रो, दोरउडी या स्पर्धा घेण्यात आल्या.
दुपारच्या सत्रात क्रीडा पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, प्रमुख अतिथी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कबड्डी खेळाडू अनुराधा डोणगावकर उपस्थित होत्या. यावेळी शिशुवृंद गटात कै. रुख्मिणीबाई दुधारे करंडक शिशुवृंद उंटवाडी व इंग्लिश मीडियम स्कूल मेरी यांनी विभागून पटकावला. तर प्राथमिक गटात फिरता चषक सागरमल मोदी प्राथमिक मेरी या शाळेला मिळाला. सूत्रसंचालन तृप्ती बडगुजर यांनी केले. मनीषा आहेर यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.