आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरामेडीकल कोर्सेस सुरु होणार:फिजीओथेरपी, नर्सिंग, पॅथोलाॅजी कोर्सेसचा समावेश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकी, फार्मसी शिक्षणाच्या सुविधा सुरु केल्यानंतर आता क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेने वैद्यकीय शिक्षणातील विविध पॅरामेडिकल कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. फिजीओथेरपी, नर्सिंग, पॅथोलाॅजी यांसह इतर पॅरामेडिकल कोर्सेस सुरु होणार असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल. त्यासाठी संस्थेने मखमलाबाद येथे सुमारे साडेतीन ते चार कोटींचा खर्च करून नवीन इमारतीचे बांधकामही सुरु केले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित हे अभ्यासक्रम राहणार आहेत.

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेने शहरातील मखमलाबाद येथे सुमारे साडेतीन कोटींहून अधिकचा खर्च करून नवीन इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. या ठिकाणी फार्मसीचे काॅलेज प्रस्तावित होते. मात्र, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या संस्थेच्या इमारतीमध्ये फार्मसी काॅलेज सुरु केल्याने आता मखमलाबाद येथील नवीन इमारतीमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे विविध कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षणाचे महत्व ओळखून पॅरामेडिकल कोर्सेस सुरु केले जाणार असल्याने त्याचा फायदा संस्थेच्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांना होऊ शकेल. तसेच संस्थेने विविध योजना हाती घेतल्या आहे. त्यात सर्व शाखांना स्वमालकीच्या इमारती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सिन्नर येथील जागेवर सर्व सुविधांयुक्त सीबीएससी बोर्डाची इंग्रजी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची योजनाही संस्थेने हाती घेतली आहे. त्याचा फायदा सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल.

येवला, नांदगावमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान काॅलेज

व्ही. एन. नाईक संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी येवला व नांदगाव या तालुक्यांत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात संस्थेच्या नाशिक येथील शैक्षणिक संकुलात प्रशस्त स्वरुपाचे ऑडिटोरीयम बांधण्यात येणार आहे.

वैद्यकीय शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा

वैद्यकीय शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन लवकरच विविध पॅरामेडिकल कोर्सेस सुरु केले जातील. आरोग्य विद्यापीठाशी संलग्नित राहून विविध कोर्सेस सुरु केले जाणार असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...