आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअत्यंत माेक्याच्या व भरवस्तीतील महात्मा गांधीराेडवर पिंपळ व उंबराच्या झाडाची अनधिकृतपणे छाटणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जागरूक वृक्षप्रेमींनी उद्यान विभागाकडे तक्रार केल्यानंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा केला. याप्रकरणी एका माेबाइल विक्रेत्यावर संशय असून वर्षभरापूर्वी अनधिकृतपणे वृक्षताेड केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. ‘हरित नाशिक’ या शहराच्या आेळखीला बट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नानाविध कारणांसाठी वृक्षताेड केली जात असून असे करण्यापूर्वी पालिकेची रितसर परवानगी घेतली जात नाही.
मनपाचे उपायुक्त मुंडे यांच्या काळात अनधिकृतपणे वृक्षताेड करणाऱ्यांविराेधात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले आहे. महात्मा गांधीराेडवर मंगळवारी पिंपळ व उंबराची छाटणी केल्याचे समाेर आले. उन्हाळ्यात दाेन्ही झाडांमुळे परिसरात गारवा पसरत हाेता. तसेच महात्मा गांधीराेडवर अलिकडेच वृक्षताेडीचे प्रमाण वाढले असून अशा परिस्थीतीत पर्यावरणपूरक व हेरिटेज वृक्ष दिसणेही दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून हळहळ व्यक्त हाेत हाेती.
गुन्हे दाखल करणार काेणतीही परवानगी न घेता महात्मा गांधीराेडवर पिंपळ व उंबराची छाटणी केल्याचा प्रकार समाेर आला आहे. उद्यान विभागाने पंचनामा केला असून संबधिताविराेधात गुन्हे दाखल केले जातील. - विजयकुमार मुंडे, उपायुक्त
सीसीटीव्ही फुटेज तपासणार उद्यान विभागाने संबधित माेबाइल दुकानदाराविराेधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जाते. याठिकाणी अनेक सीसीटीव्ही फुटेज असून त्याद्वारे वृक्षताेड करणाऱ्यांचा शाेध घेतला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.