आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडकोतील जुना प्रभाग क्रमांक २७ व २९ मधील पंडितनगर, भाद्रपद सेक्टर, मोरवाडी गाव, उत्तमनगर परिसर हा शहरातील असूनही एखाद्या ग्रामीण भागापेक्षाही अविकसितच आहे. मूलभूत सुविधाही या भागात मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाचा निषेध केला.
या परिसरात उघड्या पावसाळी नाल्यांमुळे दुर्गंधी येते, अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. वेळेवर घंटागाडी येत नाही. पथदीप बंद असतात. हा भाग दोन्ही प्रभागांच्या मध्यभागी असल्याने नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. येथे रोजंदारीवर काम करणारे मजूर व कंपनी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतात, त्यांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष हाेत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात नंतर लक्षही देत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर विकास कामे झाली नाहीत तर मोठे आंदोलन उभारू असेही नागरिकांनी सांगितले.
रस्त्यावर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनी ठिय्या मांडत मनपा प्रशासनाचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते गौरव केदार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विठ्ठल लोहार, चंद्रभान काळे, शिवराज बनसोडे, बुरकुले मावशी, मनोज केदार, बाळा चाकोर, विशाल जैस्वाल, ऋषी जगताप, शरद पवार, विमल बनसोडे, जया खणपटे, प्रवेश खंदारे, अजय बागुल आदींसह परिसरात नागरिक उपस्थित होते.
यानंतर मनपाच्या गेटवर आंदोलन ड्रेनेज, अस्वच्छता, डास, आरोग्य, पथदीप, रस्ते असे प्रश्न आहेत. आता मनपाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू. - गौरव केदार, नागरिक
अधिकारी गेंड्याच्या कातडीचे तक्रारी बघत नाहीत, अधिकारी ऊर्मट आहेत. हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असून जनतेच्या पैशाची लुटमार सुरू आहे. - विठ्ठल लोहार, ज्येष्ठ नागरिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.