आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:नियोजनाचीच ‘सायकल पंक्चर’; 5 कोटींच्या स्मार्ट प्रकल्पाला ‘ब्रेक’

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकल्पासाठी नवीन ठेकेदारच पुढे येईना; महापालिकेच्या गोडाऊनमध्ये स्मार्ट सायकल पडल्या धूळखात

स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी व्हावी तसेच शहराचे पर्यायाने नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने आणलेला शेअरींग सायकल प्रकल्प ढिसाळ नियोजनामुळे पुरता पंक्चर झाला आहे.

ठिकठिकाणी ठेवलेल्या या सायकल गोळा करुन गोडाऊनमध्ये टाकून त्याची भंगार अवस्था झाली आहे. आता मात्र स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोणत्याही नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळणार नसल्यामुळे हा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.

पीपीपी तत्त्वावर स्मार्ट सिटीतर्फे शेअरिंग सायकल प्रकल्प स्मार्ट सिटी कंपनीने सुरू केला होता. सुरुवारतीस चांगला प्रतिसाद हाेता मात्र नंतर या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक सायकल्सची मोडतोड तर काही सायकल चोरीस गेल्याने हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...