आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिकल बसेसकडे धाव:1 जूनपासून इलेक्ट्रिकल ‘शिवाई’ एसटीचे नियोजन; 150 बसेसचा पहिला करार पूर्ण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंधनाचे वाढते दरामुळे एसटी महामंडळानेही इलेक्ट्रिकल बसेसकडे धाव घेतली आहे. पहिल्या टप्प्यात १५० शिवाई या इलेक्ट्रिकल बसेस भाडेतत्त्वावर घेण्यास मंंजुरी मिळाली असून वर्षभरात ही संख्या १ हजार बसेसवर नेेण्याचे महामंडळाचे लक्ष्य आहे. १ जून या महामंडळाच्या वर्धापनदिनी याच्या पहिल्या फेऱ्या सुरू होण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाडेतत्त्वावर या इलेक्ट्रिकल बसेस घेण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ई-मूव्हेज कंपनीसोबत ५० तर ईव्ही ट्रान्स कंपनीसोबत १०० बसेस याप्रमाणे एकूण १५० शिवाई भाडेतत्त्वावर घेण्याबाबतचा करार झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, बाेरिवली-ठाणे, बाेरिवली-पुणे आदी मार्गांवर या बसेस सुरू करण्यात येतील.

अद्याप भाडेदराबाबत निर्णय झाला नाही
एसटीच्या वतीने मोठा गाजावाजा करत एसटीच्या इलेक्ट्रिकल बसेस सुरू करण्यात येणार आहेत. मात्र अद्यापपर्यंत या बसेसच्या भाडेदराबाबत कोणताही ठाेस निर्णय झालेला नाही.

असे आहे नियोजन
- ५० गाड्या पुणे-कोल्हापूर-सोलापूर-औरंगाबाद-नाशिक या मार्गावर धावतील
- १०० गाड्या पुणे-ठाणे-दादर-बोरिवली या मार्गावर धावतील
- ज्या मार्गावर बस धावणार तेथील आगारात चार्जिंग स्टेशन उभारणार

बातम्या आणखी आहेत...