आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरेच्या जतनासाठी:नाशिककरांची मांगीतुंगीपर्यंत सायकल स्वारी; 108 जणांचा सहभाग, पर्यावरण रक्षणाचा निर्धार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लावा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश देत नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनची नाशिक ते मांगीतुंगी अशी 125 किमीची सायकल स्वारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी 108 जणांनी हा प्रवास पूर्ण करत पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

नाशिक सायकलिस्ट फाऊडेशनच्यावतीने एनआरएम मांगीतुंगी राइडच्या फ्लॅग ऑफसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी डॉ अर्जुन गुंडे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपायुक्त संजय बारकुंड, मांगीतुंगी सिद्धिक्षेत्र जैन देवस्थानचे सुमेरकुमार काले, महामंत्री उपेंद्र लाड, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे ,उपाध्यक्ष किशोर माने तसेच रवींद्र दुसाने, मनीषा रौंदळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ठिकठिकाणी स्वागत

सायकल फेरीच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. देवळा सायकलिस्ट यांच्यावतीने देवळा नगरीत ढोल ताशांच्या गजरात अल्पोपहार, फूल देऊन सर्व सायकलिस्ट यांचा सत्कार केला. तसेच सटाणा येथील बागलान सायकलिस्ट यांनी ढोल ताशाच्या गजरात, फटाके, पेढे पुष्प, फेटे बांधून, मशाल रण काढून सर्व सायकलिस्ट यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला.

भगवान ऋषभनाथांचे दर्शन

राइडसाठी 108 फूट मूर्ती व 108 रायडर्स अशी संकल्पना किशोर काळे यांची होती. त्याप्रमाणे सायकलिस्ट आले बागलान सायकलिस्ट धरून मांगीतुंगीला पंधरा महिलांनी या राइडमध्ये सहभाग घेतला. मांगीतुंगी येथे सिद्धक्षेत्र ट्रस्ट व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने भव्य वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सायकिल्टनी भगवान ऋषभनाथ यांच्या भव्यदिव्य मूर्तीचे दर्शन घेतले. ही मोहीम यशस्वी पूर्ण केल्याबद्दल सर्व सायकलिस्ट यांना सुमेरकुमार काले, प्रदीप जैन, राजेंद्र वानखेडे ,किशोर माने, रवींद्र दुसाने, मनीषा रौंदळ,अनुराधा नडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या राइडचे नियोजन किशोर काळे, संजय पवार, अनिल सुपे, नलिनी कड, रोहिणी भामरे, प्रवीण पवार यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...