आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:वृक्ष लावा पर्यावरण वाचवा; नाशिक ते मांगीतुंगी सायकल राइडद्वारे पर्यावरण बचावचा संदेश

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘वृक्ष लावा पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा’ असा संदेश देत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नाशिक ते मांगीतुंगी अशी १२५ किलोमीटरची सायकल राइड मोठ्या उत्साहात रंगंली. पर्यावरण बचावचा संदेश यानिमित्ताने पर्यावरणदिनी देण्यात आला.

नाशिक सायकलिस्ट फांउडेशनच्या वतीने एनआरएम मांगीतुंगी राइडच्या फ्लॅगॉसाअॉठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. अर्जुन गुंडे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपायुक्त संजय बारकुंड, मांगीतुंगी सिद्धिक्षेत्र जैन देवस्थानचे सुमेरकुमार काले, महामंत्री उपेंद्र लाड, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष किशोर माने, तसेच रवींद्र दुसाने, मनीषा रौंदळ यांच्या हस्ते करण्यात आला.

राईडच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. देवळा सायकलिस्टच्या वतीने देवळा नगरीत ढोल ताशांच्या गजरात अल्पोपहार, फुल देऊन सर्व सायकलिस्ट यांचा सत्कार केला. सटाणा येथील बागलाण सायकलिस्ट यांनी ढोल ताशाच्या गजरात, फटाके, पेढे पुष्प, फेटे बांधून, मशाल रण काढून सायकलिस्टचा सत्कार देखील करण्यात आला. राईडसाठी १०८ फूट मूर्ती व १०८ रायडर्स अशी संकल्पना किशोर काळे यांची होती.

बागलाण सायकलिस्टच्या पंधरा महिलांनी या राइडमध्ये सहभाग घेतला. मांगीतुंगी येथे सिद्धक्षेत्र ट्रस्ट व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. १०८ फूटी मूर्तीचे दर्शन सर्व सायकलिस्टने घेतले. राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व सायकलिस्ट यांना सुमेरकुमार काले, प्रदीप जैन, राजेंद्र वानखेडे, किशोर माने, रवींद्र दुसाने, मनीषा रौंदळ, अनुराधा नडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. राईडचे नियोजन व परिश्रम किशोर काळे, संजय पवार, अनिल सुपे, नलिनी कड, रोहिणी भामरे, प्रवीण पवार यांनी घेतले.

बातम्या आणखी आहेत...