आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:वीरनारी वीरमाता संघटनेतर्फे 100 देशी वृक्षांची लागवड

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने शहीद जवानाच्या स्मरणार्थ “एक पेड शहीदोंके नाम” हा उपक्रम राबवला. १०० देशी वृक्ष लावण्यात आले.विरनारी वीरमाता संघटनेकडून शहीद श्रीकांत बोडके यांच्या वारसाला शासनाकडून मिळालेल्या जमिनीवर वृक्षाराेपण करण्यात आले. उपक्रमाअंतर्गत नारळ, आंबा, सिल्व्हर ओकच्या तब्बल १०० वृक्ष लावण्यात आले.

संस्थेच्या वतीने वृक्षाचे संगोपन शहीद जवानाच्या आठवणीप्रमाणे करण्याचा आणि या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. माजी सैनिक विजय कातोरे व वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रेखा खैरनार यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वीरमाता कृष्णाबाई बोडके, वीरनारी शुषमा मोरे, वीरनारी शैला पाचरणे, वीरनारी सविता लांडगे, प्रीती बोडके व पोलिस अधिकारी किरण बोडके आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...