आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड व सातपूर दोन्ही औद्योगिक परिसर सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल म्हणून त्या परिसरातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा व त्याचे कायमस्वरूपी जतन करण्याचा संकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) घेतला. या दोन्ही औद्योगिक वसाहत हिरव्यागार होतील. याकरता विशेष प्रयत्न केले जात असून, असा निर्धार एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी व्यक्त केला.
वृक्षारोपण करण्यात आले
जवळपास तीन हजार उद्योजक सभासद असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड औद्योगिक वसाहतीतील, आयमा हाऊस, सेंट्रल वेअर हाऊस, पांचाळ इंजिनीअर्स येथील व ट्रंम्फ इंजिनीअरिंग परिसरात मान्यवरांच्या हस्ते मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात गवळी मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब,कार्यकारी अभियंता जे. सी.बोरसे,आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सचिव योगिता आहेर, वृक्षलागवड समिती चेअरमन दिलीप वाघ आदी होते.
पांचाळ यांचे आवाहन
कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासली त्यावेळी सर्वानाच झाडांचे महत्व पटले याची आठवण करून देत अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आयमा सक्रिय पुढाकार घेते, असे यावेळी आयामाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी स्पष्ट केले. ग्लोबल वार्मिंगचा धोका ओळखून प्रत्येकाने पर्यायावरण संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे आणि किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असेही पांचाळ यांनी यावेळी आवाहन केले. सर्व नियमांचे पालन व अभ्यास करून व चांगल्या प्रतीची झाडे औद्योगिक परिसरात लावण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जे सी बोरसे यावेळी म्हणाले. आयमाचे माजी अध्यक्ष वरूण तलवार यांनी भविष्याचा वेध घेऊन आणि किमान पन्नास वर्षे जगातील अशीच आणि विशेषतः ऑक्सिजनवर्धक झाडे लावावीत असे सुचवले. आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार प्रदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास माजी अध्यक्ष जे.आर.वाघ, ज्ञानेश्वर गोपाळे, सचिव गोविन्द झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे, हर्षद बेळे, संजय महाजन, विनीत पोळ, अविनाश मराठे, जगदीश पाटील, राहुल गांगुर्डे, देवेंद्र राणे, जयंत पगार, रवींद्र झोपे, कुंदन डरंगे, देवेंद्र विभुते, अजय यादव, राजा स्वामी गोस्वामी, महेश उदावंत आदी उद्योजक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.