आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:साबर प्रजातीच्या 1100 वृक्षांची लागवड; बेलगांव ढगा येथे 160 प्रजातींचे गत 3 वर्षात जतन

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावाचा विकास हा पर्यावरणपुरक असावा यासाठी कायम पुढाकार घेणाऱ्या बेलगांव ढगा गावात आता ग्रामस्थांच्या पुढाकारातून पर्यावरणासाठी उपयुक्त असलेल्या ‘साबर’ या भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच गावात विविध १६० भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून तीन वर्षापासून वृक्षांचे जतनही योग्य पद्धतीने केले जात आहे.

नित्याने वाढणाऱ्या प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्षलागवड हेच प्रभावी अस्त्र आहे. त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाण्यासाठी गावात हिरवेगार भारतीय वृक्ष वाढविले पाहिजे, याच उद्देशाने बेलगांव ढगा या गावामध्ये १६० पेक्षा अधिक भारतीय प्रजातींचे तीन वर्षापासून जतन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कमी होत चाललेल्या ‘साबर’ या दुर्लक्षित पण पर्यावरणाला महत्त्वपूर्ण अशा झुडुप, निवडूंग वर्गातील अकराशे कलमांची लागवड गावात करण्यात आल्याची माहीती सरपंच दत्तू ढगे यांनी दिली.

तसेच ग्रामस्त संतोष कर्डिलेंसह त्यांच्या परिवाराचे अन् ग्रामस्थांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून या कालावधीतही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीतून वृक्ष संवर्धन करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...