आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे निधन:अस्थी, राखेत माती मिसळून केले वृक्षराेपण ; आडगाव येथील भालेराव कुटुंबाचा आदर्श

सिडकाेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत विसर्जीत केल्या की मुक्ती मिळते या वाक्याला तिलांजली देत भालेराव व मोहिते कुटुंबीयांनी आदर्श उभा केला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अस्थी, राखेत माती मिसळून त्यात वृक्षराेपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. आडगाव येथील भालेराव कुटुंबियांतील ज्येेष्ठ व्यक्ती सिंधू भालेराव यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता आपली आई कायम स्मरणात राहावी म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आवडते आंब्याचे झाड लावण्यात आले.

खड्डा खोदून तेथे अस्थी टाकण्यात आल्या व त्यावर आंब्याचे झाड लावण्यात आले. आईला श्रद्धांजली वाहण्यात आली. व ते झाड जगवून स्मृती जपताना पर्यावरण जागृतीची शपथ घेण्यात आल्याने भालेराव व मोहिते कुटुंबीयांनी एक आदर्श उभा केला. नाशिकला गाेदापात्रेचे वैभव आहे. गाेदापात्रात अस्थी विर्सजन माेठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे नदीत प्रदुषण हाेते. ही बाब लक्षात घेत अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम भालेराव कुुंटुबीयांनी केले. विविध भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे काैतुक केले.

पर्यावरण रक्षणाची शपथ घेत श्रद्धांजली सासूबाईंच्या निधनानंतर आम्ही त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अस्थींवर आंब्याचे झाड लावून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. अशा प्रकारे सर्वांनी झाडे लावली तर निसर्गाचे रक्षण होईल. हा संदेश यातून दिला आहे. तसेच नद्यांमध्ये देखील पाणी प्रदुषित हाेणार नाही. युवकांनी देखील वृक्षराेपणासाठी पुढे यायला हवे. - किरण मोहिते, सामजिक कार्यकर्ते, नाशिक

बातम्या आणखी आहेत...