आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती‎:पीएम युवा मेंटाॅरशिप योजना, 75 युवा‎ लेखकांना 50 हजारांची शिष्यवृत्ती‎

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) ‎ पीएम युवा मेंटाॅरशिप स्कीम २.० योजनेअंतर्गत ‎ युवा लेखकांसाठी योजना सुरू केली आहे. ‎ यामध्ये निवड झालेल्या युवा लेखकांना प्रति ‎ महिना ५० हजार रुपयांची शिष्यवृत्तीही दिली ‎ जाणार आहे. यामध्ये अंतिम पात्रता यादीत ७५ ‎ जणांची निवड होईल. ‎ अधिकची माहिती तपशील ‎www.nbtindia.gov.in आणि ‎ www.mygov.in वर पाहता येईल.

युवा ‎ लेखकासाठी पीएम युवा मेंटॉरशिप स्कीम ‎ (YUVA) 2.0 योजनेअंतर्गत लेखकांची ‎ निवड करण्यासाठी १५ जानेवारी २०२३ या‎ कालावधीत ऑनलाइन राष्ट्रीय स्पर्धा‎ आयोजित करण्यात आली आहे. निवडलेल्या‎ ७५ लेखकांना प्रत्येकी सहा महिन्यांच्या‎ कालावधीसाठी ५० हजार रुपये प्रति महिना‎ शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. नॅशनल बुक‎ ट्रस्ट, इंडिया मेंटॉरशिप योजनेचा भाग म्हणून‎ तरुण लेखकांनी तयार केलेली पुस्तके प्रकाशित‎ केले जाणार आहे. योजनेची माहिती सर्व‎ विद्यार्थी आणि इतर युवा लेखकांपर्यंत‎ पोहोचवावी. स्पर्धा व योजनेविषयीची‎ अधिक माहिती https://innovatei‎ dia.mygov.in/yuva या संकेतस्थळावर‎ उपलब्ध करून देण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...