आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रात्री उशिराने विनाकारण फिरणाऱ्या 57 टवाळखोरांवर पोलिस पथकाची कारवाई ; सलग तिसऱ्या दिवशी कोंबिग कारवाईचा धडाका

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सलग तिसऱ्या दिवशी कोंबिग ऑपरेशन करण्यात आले. रात्री उशिराने विनाकारण फिरणाऱ्या ५७ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध अशा विविध १९६ जणांवर कारवाई करण्यात आली. वाढलेली गुन्हेगारी आणि टवाळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कों‌बिंग ऑपरेशन मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहे. पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिसऱ्या दिवशी कोंबिग ऑपरेशन राबवण्यात आले. रात्री ८ ते ११ आणि रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत पायी पेट्रोलिंगग केली जात आहे.

पोलिस आयुक्तांची शहरात गस्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कोंबिग ऑपरेशन च्या वेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त केली. अचानक गस्त केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास हुरुप आला. आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना फ्रि हॅण्ड कारवाई करण्याच्या सुचना दिल्याने शहरात कोंबिग ऑपरेशन मध्ये सर्वाधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली जात आहे.

कारवाईची आकडेवारी अवैध हत्यार प्रतिबंधक कारवाई- ४, पाहिजे असलेले आरोपी तपासणी- १२, रेकॉर्डवरील आरोपी तपासणी- ४२, हिस्ट्रीसीटर तपासणी- २४ सर्व्हेलन्स आरोपी तपासणी- २०, तडीपार आरोपी तपासणी- १९, टवाळखोर कारवाई- ५७ वेळेत दुकाने बंद न करणे- १, संशयास्पद फिरणारे- ३ विना परवानगी शहरात येणारे तडीपार- ३ आरोपी तपासणी- १०

कारवाई अशी | पंचवटी ६३, आडगाव १९, म्हसरुळ २६, सरकारवाडा १५ भद्रकाली २१ गंगापूर २९ मुंबईनाका २३, असे १९६ कारवाया करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...