आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल‎:उपद्रव करणाऱ्या 10 जणांना पोलिसांकडून दणका‎

सिडको‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नम्रता‎ पेट्राेलियमच्या समाेरील माेकळ्या जागेत‎ उपद्रव करून परिरसरातील रहिवाशांना‎ त्रास देणाऱ्या १० जणांच्या टाेळक्यास गस्त‎ पथकातील कर्मचाऱ्यांनी दणका दिला. या‎ दहाही संशयितांविराधात मुंबई पाेलिस व‎ दारूबंदी अधिनियमांन्वये गुन्हे दाखल‎ करून अटक करण्यात आली.‎ मोकळ्या जागेत काही व्यक्ती‎ मद्यप्राशन करून उपद्रव माजवत‎ असल्याच्या गोपनीय माहितीनुसार, अंबड‎ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला‎ समजताच त्यांनी घटनास्थळी धाव‎ घेतली.

त्याचवेळी मद्यपान करून उपद्रव‎ माजविणाऱ्यांना जागेवरच ताब्यात घेतले.‎ ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक‎ युवराज पतकी यांच्या मार्गदर्शनाखाली‎ सहायक निरीक्षक वसंत खतेले,‎ उपनिरीक्षक संदिप पवार, अंमलदार रवींद्र‎ पानसरे, किरण गायकवाड, जर्नादन‎ ढाकणे, दीपक जगताप, अनिल ढेरंगे,‎ संदिप भुरे आदींच्या पथकाने केली.‎ यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार‎ असून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन‎ करू नये, असे आदेश देण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...