आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:नाशिकमध्ये मटका व्यवसाय सुरू करण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच; 40 हजार रुपये घेताना 2 पोलिसांना अटक

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मटका व्यावसाय सुरू करण्यासाठी अवैध व्यावसायिकाकडे 80 हजारांची लाच मागताना वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या सुभेदाराला तडजोडीअंती 40 हजार रुपये घेताना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी पोलिस ठाण्याच्या आवारात ही कारवाई केली. किसन रमेश कापसे, संतोष दिनकर वाघ असे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अवैध व्यावसायिक आहे. त्याला वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरवाडे फाटा येथे कल्याण बाजार मटक्याचा व्यावसाय सुरू करायचा असल्याचे सांगितले. पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने नियुक्त केलेले कलेक्टर संशयित किसन कापसे आणि संतोष वाघ यांना भेटण्यास सांगितले. दोघांनी तक्रारदार व्यावसायिकाकडे 80 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 40 हजार रुपये मागितले.

अन् तक्रार केली

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. पथकाने वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला आणि दोन्ही पोलिसांना तक्रारदारांकडून 40 हजारांची लाच घेताना बेड्या ठोकल्या. निरीक्षक गायत्री जाधव, प्रफुल्ल माळी, प्रकाश महाजन यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईने ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे अधोरेखीत झाले. अधीक्षकांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन केल्याचा दावा फोल ठरल्याची चर्चा ग्रामीण पोलिस दलात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...