आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस दलात श्वानाला अतिशय महत्त्व आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता पोलिस दलातील श्वान पथकावर उपासमारीची वेळ आली आहे. या श्वानांना मेडिकलमधून अन्न पुरवठा केला जाताे. मात्र मागील वर्षांपासून या वितरकाचे बिल थकल्याने त्याने पुरवठा बंद केला आहे. पोलिस दलात गुगल, मॅक्स, निता, सिंबा, लकी, अल्फा हे श्वान बीडीडीएस व श्वान पथकात कर्तव्य बजावत आहेत. या श्वानांचा देखभाल खर्च शासनाकडून केला जातो. प्रत्येक श्वानाला महिन्याला सुमारे १४ हजारांची एक फूड बॅग लागते.
फूड, दूध आणि इतर किरकोळ खर्च असा एका श्वानावर १८ हजार रुपयांचा खर्च महिन्याकाठी हाेताे. या श्वानांना अन्नपुरवठा करण्याचा ठेका अशोक स्तंभावरील एका मेडिकलला दिला आहे. या दुकानदाराला १० महिन्यांपासून बिल मिळाले नसल्याने त्याने पुरवठा बंद केला आहे.हीच अवस्था दूध वितरकाची आहे. माणुसकीच्या नात्याने हे दोन्ही विक्रेते बिल रखडले असूनही पुरवठा करत होते. मात्र मेडिकलचे ९ लाख आणि दूध विक्रेत्याचे ३७ हजारांचे बिल रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.