आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात 16 ठिकाणी 'नो ड्रोन फ्लाय' झोन घोषित:ड्रोन उडवण्यासाठी आता पोलिसांची परवानगी अनिवार्य

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मिलिटरी परिसरात अनाधिकृत ड्रोन उडवण्याचे दोन प्रकार घडल्यानंतर पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरातील 16 ठिकाणे 'नो ड्रोन फ्लाय' झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. ड्रोन उडवण्याच्या घटनांमुळे आता कुठल्याही कार्यक्रमात ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.

पोलिसांनी घेतली गंभीर दखल

आयुक्तालयाच्या हद्दीतील लष्कराच्या प्रतिबंधीत ठिकाणी ड्रोन उडवण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. घडलेल्या घटना गंभीर असल्याने राष्ट्रीय सुरक्षा सार्वजनिक सुरक्षितता आणि संभाव्य घातपात कृत्य होण्याची शक्यता असल्याने याकरीता प्रतिबंधात्म उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षितता, महत्वाची धर्मस्थळे, लष्करी परिसर, आणि संवदेनशिल ठिकाणे यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहरातील 16 ठिकाणे संवदेशनशील घोषित केले आहे. हे ठिकाणे 'नो ड्रोन फ्लाय' म्हणून घोषित केले आहे.

हे आहेत नो ड्रोन फ्लाय झोन

स्कुल ऑफ अर्टलरी देवळाली कॅम्प, इंडिया सिक्युरीटी प्रेस, महसुल आयुक्त कार्यालय, करन्सी नोट प्रेस, एकलहरे धर्मल पॉवर, शासकीय मुद्राणालय गांधीनगर, श्री काळाराम मंदिर, एअरफोर्स स्टेशन बोरगड, कॅम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, मध्यवर्ती कारागृह, किशोर सुधारालय, पोलिस अकादमी, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय,आकाशवाणी केंद्र, पोलिस आयुक्तालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालय, रेल्वे स्टेशन नाशिकरोड, मनपा जलशुद्धी केंदर शिवाजी नगर, विल्होळी, अंबड,

ड्रोन ऑपरेटर साठी परवनागी आवश्यक

ड्रोन मालर, ऑपरेटर यांना कुठल्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या ड्रोनद्वारे छायाचित्रिकरण करावयाचे असल्यास पोलिस आयुक्तालय यांच्याकडून परवनागी अनिवार्य राहिल. परवानगी संबधित पोलिस स्टेशनला ड्रोन तपासणी करीता द्यावा लागले. सशुल्क पोलिस कर्मचाऱ्याच्या देखरेखेखाली कार्यक्रमाचे चित्रिकरण करावे. चित्रिकरण झाल्यानंतर ड्रोन पुन्हा पोलिस ठाण्यात जमा करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...