आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पाेलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे शिवसेनेतर्फे 19 नाेव्हेंबरला आयाेजन

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनामुळे गेल्या दाेन वर्षांत पाेलिस भरती झाली नसल्यामुळे तसेच वाढती बेराेजगारी लक्षात घेत शिवसेनेने हाेतकरू युवकांना आधार देण्यासाठी माेफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे पालिकेतील माजी विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांनी ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार, दि. १९ नाेव्हेंबर राेजी पोलिस भरतीच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

यासंदर्भात बाेरस्ते यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी अनेक वर्षांपासून केली जात आहे मात्र आवश्यक संधी नसल्यामुळे युवकांची अडचण झाली हाेती. ही बाब लक्षात घेत, युवकांना सहकार्य केले जाणार आहे.

पाेलिस हाेण्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यासा बरोबर शारीरिक तयारी देखील करत सून परीक्षेच्या वेळेस कागदपत्रांची जमवाजमव, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणीची पूर्वकल्पना असणे व त्यासाठी आपण किती तत्पर आहोत याच अनुषंगाने या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयाेजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...