आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद:ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे 1100 युवकांना पाेलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनातर्फे पोलिस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर युवकांना भरती प्रक्रियेविषयी माहिती व्हावी तसेच स्वयंम मूल्यमापन करता यावे या उद्देशाने ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे केटीएचएम काॅलेज येथे पोलिस भरती स्वयंम मूल्यमापन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सुमारे ११०० युवक सहभागी झाले आहेत.

या भरतीत नाशिकमधील जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. क्रीडा साहित्याचे पूजन करून शिबिरास प्रारंभ झाला.

याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे, विलास शिंदे, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, अश्वमेध करिअर अकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते, अमित बोरस्ते आदी उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी पोलिस भरतीमध्ये लेखी परीक्षेत मराठी विषयातील व्याकरणावर आधारित प्रश्न व त्यांची नव्याने निश्चित करण्यात आलेली उत्तरे यांच्या संबंधातील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

आज लेखी परीक्षा
शिबिरात रविवारी (दि. २०) सकाळी १२ वाजता लेखी परीक्षा हाेईल. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी शिबिरात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची उंची मोजून मुलांसाठी १६०० मीटर तर मुलींसाठी ८०० मीटरची रनिंग चाचणी व गोळाफेक चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येईल यासाठी क्रीडाशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...