आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी:पोलिस भरती; 60 उमेदवारांची चाचणी‎

नाशिक‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई‎ चालक पदासाठी ६० उमेदवारांची‎ चाचणी मंगळवारी (दि. २४)‎ घेण्यात आली. उर्वरित उमेदवारांची‎ चाचणी आज घेण्यात येणार आहे.‎ चालक पदासाठी २११४ उमेदवार पात्र‎ ठरले आहे. या पात्र उमेदवारांची‎ वाहन चालवण्याची चाचणी परिक्षा‎ ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या‎ मैदानावर सुरु आहे. सायंकाळ पर्यंत‎ ही चाचणी सुरू होती. यातील पात्र‎ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड‎ करण्यात येणार आहे.‎ शिपाई पदासाठी १८९३५ उमेदवार‎ पात्र ठरले आहे. चालक शिपाई‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पदासाठी २११४ उमेदवार पात्र ठरले‎ आहेत. या पात्र उमेदवारांची मैदानी‎ चाचणी सुरू आहे. चालक पदासाठी‎ पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चाचणी पूर्ण झाली असून वाहन‎ चालवण्याची चाचणी सुरू आहे.‎ यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची‎ लेखी परीक्षेसाठी निवड हाेईल.‎

बातम्या आणखी आहेत...