आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये खाकी ठरली देवदूत:प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 2 तरुणाचा आणि एका महिलेचा पोलिसांनी वाचवला जीव

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खून प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांचे पहिले काम असते ते हल्लेखोरांचा शोध घेणे मात्र यास अपवाद ठरले आहेत नाशिक शहर पोलिस. पंचवटी मधील दोन आणि म्हसरुळ मधील एक गुन्ह्यात गंभीर जखमी झालेल्या दोन तरुण आणि एका महिलेला पोलिसांनी गोल्डन अवर्स मध्ये उपचारार्थ दाखल करत जीव वाचवला तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक मदत मिळून देत कुटुंबियांची मदत करत ‘खाकी’खऱ्या अर्थाने देवदूत ठरली आहे.

पोलिस दल हे सर्वाधिक टिका होणारे खाते आहे. मात्र खाकीमध्येही मानुसकी जिवंत असल्याची शहर पोलिसांनी दाखवून दिली. 4 जून रोजी पंचवटी परिसरातील विजय नगर येथे व्हाट्सअप ग्रुपवर न विचारता समाविष्ट केल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी दिपक डावरे या तरुणावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले होते. हा तरुण जीवन मरणाच्या दारात असतांना पोलिसांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचवला विशेष म्हणजे या तरुणाला वडिल नाही तो विधवा आईचा एकुलता एक मुलगा आहे. असाच एक प्रकारात पेठरोड येथील तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या तरुणालाही पोलिसांनी वेळीच खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करत त्याचेही प्राण वाचवले. म्हसरुळ येथे 7 जून रोजी आरोपी राजु ठाकुर याने पत्नी चंदा ठाकुर वय 45 हिचा गळा चिरुन इमारतीच्या तिसऱ्या मजल्याहून उडी घेत आत्महत्या केली होती. गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेलाही पोलिसांनी वेळीच खासगी रुग्णालयात दाखल केल्याने या महिलेचा जीव वाचला. उप आयुक्त अमोल तांबे, वरिष्ठ निरिक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांनी पाठपुरावा केला.पोलिसांची जखमींना वाचवण्याची धावपळ बघून रुग्णालय प्रशासनही भाऊक झाले.

जखमींना अर्थसाह्य

दोन्ही घटनेत जखमी झालेले तरुण आणि महिला यांच्या कुटुबियांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. खासगी रुग्णालयात उपचार परवडेलका या भीतीने दोन्ही कुटुंब ग्रासले होते. उपआयुक्त तांबे, वरिष्ठ निरिक्षक डॉ. कोल्हे यांनी सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था आणि दाणशूर व्यक्तींशी संपर्क साधून मदत करण्याचे अवाहन केले. तसेच रुग्णालय प्रशासनालाही बिल कमी करण्यासाठी विनंती केली.

पोलिसांमुळे वाचला जीव

किरकोळ कारणावरुन मुलाच्या पोटात कोयता मारुन गंभीर जखमी केले होते. मुलगा वाचेल की नाही याची शाश्वती नव्हती. पोलिसांनी मुलाला वेळीच उपचार मिळून दिले. आर्थिक मदतही केली पोलिसांमुळे माझा मुलगा जीवंत आहे. पोलिसांच्या उपकाराची परतफेड या जन्मात करणे शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...