आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 साली करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. या दिवसापासून 2 जानेवारी हा पोलिस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून शहर पोलिस दलातील सर्वच पोलिस बांधवांनी सोशलमिडियावर शुभेच्छा दिल्या.
असा आहे इतिहास
महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राज्यात कायम आहे. महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. 36 जिल्हे असलेल्या राज्यात पोलिस स्थापनेला 62 वर्ष पुर्ण होत आहे. देशावर पोर्तुगीजांचे राज्य असतांना पोलिस चौकीची स्थापना केली होती. ही फौज शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलिस दलाचा उगम झाला.
1936 मध्ये सिंध प्रांत पोलिस हे बाॅम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाव बदलून बाॅम्बे राज्य पोलिस असे नाव ठेवले गेले. 1956 नंतर मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी झाली. यानंतर महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी करण्यात आली. 1961 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. पोलिस दलाची अधिकृत स्थापना झाली. राज्यात हा दिवस पोलिस स्थापना दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी 1672 पासून रक्षक नेमले गेले होते. यास भंडारी ब्रिगेड नावाजी फौज अधिक शिस्तबद्ध होती.
पोलिस हा प्राचीन शब्द
पोलिस हा युरोपीयन भाषेतील शब्द आहे. याचा शब्दाचा अर्थ नगरासाठी रक्षण करणारा, तसेच पाली साहित्यातून नगरपाल म्हणजे नगराचे रक्षण करणारा असे नाव पोलिस अधिकाऱ्याला दिलेले आढळते. प्राचीन शब्द आरक्षी शरीर व मालमत्तेची रक्षण करणारा आरक्षी असा उल्लेख आढळतो.
पोलिस कर्मचाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
पोलिस स्थापना दिवसा निमित्त पोलिस कर्मचाऱ्यांना नागरीकांनी शुभेच्छा दिल्या. बहुतांशी पोलिस कर्मचाऱ्यांना मोबाईलवर स्टेटस ठेवले असल्याने नागरीकांना पोलिसांच्या प्रती आदर दाखवत त्यांना सोशलमिडियावर शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.