आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो सेल्फी झोन:पोलिस ठाणेनिहाय आपत्ती व्यवस्थापन ; पर्यटकांची नोंद ठेवा, धोक्याच्या ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’च्या सूचना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस ठाणेनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून पूरपरिस्थितीतील प्रमाणित कार्यपद्धतीचे व्यवस्थापन करावे. जूनच्या पहिल्या दिवसापासून २४ तास आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करा आणि जोखमीच्या ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ जाहीर करा, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोलिसांना दिल्या आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनची तयारी करावी. त्यात पर्यटकांची व भाविकांची माहिती नियंत्रण कक्षाला उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात नोंद ठेवावी, सोमेश्वर धबधबा, नांदूरमध्यमेश्वर बंधारा व इतर पर्यटनस्थळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ व आराखडा तयार करावा. अतिवृष्टीमुळे रस्ता खचणे, दरड कोसळणे, पाझर तलाव गळती, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, पूर पाहण्यासाठी गर्दी, इमारत कोसळणे आदी संभाव्य घटनाप्रसंगी गर्दी नियंत्रणासाठी मनुष्यबळ घटनास्थळी तैनात करणे, या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोलिस यंत्रणांना कळविले आहे. आपत्ती नियंत्रण कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. जीवरक्षक, पोहणारे, गिर्यारोधक, पक्षीमित्र, सर्पमित्र यांची दूरध्वनी यादी अद्ययावत ठेवावे. आपत्ती प्रवण क्षेत्राचा नकाशा यासह स्थापित नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.

नाेडल अधिकारी नियुक्त करणार प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा व आदर्श अंमलबजावणी पद्धत तयार करून त्याची एक प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावयाची आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांचा संपर्क क्रमांक व इ-मेल या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयास सादर करण्याची व्यवस्था करावयाची आहे.

बातम्या आणखी आहेत...