आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:विनापरवानगी ड्राेन उडवल्यास कारवाई; पाेलिसांचा इशारा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपनगर आणि आडगाव पोलिस ठाण्याच्या लष्करी हद्दीत ड्रोन कोणी उडवले याचा तपास करण्यास यंत्रणा अपयशी ठरली आहे. मात्र, आता ड्रोन उडवण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असून विनापरवानगी ड्रोन उडवल्यास कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिला. तत्कालीन आयुक्तांचा भोंग्यासंदर्भात आदेश मागे घेतला असून हेल्मेट, अनधिकृत फलकबाबत निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले.

पोलिस आयुक्तालयात प्रसारमाध्यमांना गुन्ह्यांच्या तपास आढावासंदर्भात माहिती देतांना आयुक्तांनी वरील माहिती दिली. अनधिकृत फलक, पंपावर विनाहेल्मेट पेट्रोल दिले जात असल्याने याबाबतच्या अधिसूचना मागे घेतल्या की काय यावरआयुक्तांनी वरील स्पष्टीकरण दिले.

बातम्या आणखी आहेत...