आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोेटिसा:गंगापूर धरणानजीकच्या तीन रिसॉर्टला प्रदूषण मंडळाच्या नोेटिसा

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

धरणानजीक असलेल्या व मलजल विनाप्रक्रिया धरणाच्या पाण्यात मिसळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रिसॉर्ट, हॉटेल्सवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपले लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वीच सोमंडा विनियार्डस‌्ला अशाच प्रकरणात क्लोजरचे आदेश काढण्यात आले होते. यानंतर आता गंगापूर धरणालगत तीन रिसॉर्टचे बांधकाम सुरू असून, या रिसॉर्टमधून येणाऱ्या मलजलाबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रिसॉर्ट चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच सोमंडा विनियार्डसला प्रकल्प बंद करण्याबाबतची एमपीसीबीने नोटीस बजावली होती.गंगापूर, कश्यपी तसेच त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या परिसरात मोठमोठे रिसॉर्ट असून, येथून बाहेर पडणाऱ्या मलजल याबाबत रिसॉर्ट चालकांनी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. अशा सर्वच रिसॉर्टवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची नजर असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, एमपीसीबीने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर धरणालगत असलेल्या ॲक्वा व्हिस्टा व्हीला, चौधरी फार्म्स आणि आर्या हॉटेलला नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या या तीन्ही रिसॉर्ट तथा हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. मात्र या रिसॉर्टमधून दररोज निघणारे सांडपाणी, तसेच मलजलावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया यंत्रणा बसवलेली नाही. अशात तत्काळ याबाबतची यंत्रणा बसविण्यात यावी अशा आशयाची नोटीस सध्या तरी बजावण्यात आली आहे.