आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था:मदिनानगर भागातील अन्य रस्त्यांची दुरवस्था; वडाळ्यातील दीड किमी रस्त्याची वाताहत

नाशिकएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

वडाळागाव परिसरातील दीड किलोमीटर रस्त्याची वाताहत झाली आहे. मदिनानगर भागातील अन्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या मुख्य रस्त्यासह परिसरातील सर्वच छोट्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून गैरसोय टाळण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मदिनानगर परिसरातील या दीड किलोमीटर रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब असून नागरिकांना खड्ड्यात हरवलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

दुचाकीचालकांना चिखलातून वाट शोधावी लागत असल्याने अपघातांसह वाहने घसरण्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. तारेवरची कसरत करत वाट शोधणाऱ्या या वाटसरूंच्या आरोग्याचाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. दर पावसाळ्यात ही स्थिती होते. तुरळक पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन फसण्याचे तसेच अपघाताचे प्रकार घडत आहेत. यामुळे वाहनांचे मेंटेनन्सही वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या संबंधित विभागकडून तात्पुरते रस्त्याचे खडीकरण केले जाते, परंतु एका पावसात रस्त्याची पुन्हा वाताहत होते.

बातम्या आणखी आहेत...