आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरशेजारी असलेल्या मनपाच्या समर्थ जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली असून या ट्रॅकवर नियमित पाणी मारणे, स्वच्छता होत नसल्याने जॉगर्स त्रस्त झाले असून आयुक्त रमेश पवार यांनी तातडीने या ट्रॅकवर स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांनी केली आहे. पश्चिम विभागातील गंगापूररोड परिसरातील मोठ्या संख्येने लहानांपासून ते वृद्धांपर्यंत शेकडोंच्या संख्येने पहाटेपासूनच या ट्रॅकवर वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी रात्री उशिरापर्यंत जॉगिंग ट्रॅकवर व्यायामप्रेमी व्यायामासाठी येत असतात. काही तरुणांकडून धावण्यासह वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. वृद्ध व महिलावर्ग याच ठिकाणी योगासनेदेखील करतात. मात्र, काही दिवसांपासून हा ट्रॅक समस्याग्रस्त बनला आहे. या समस्यांचे तातडीने निराकरण करून ट्रॅकची दुरवस्था दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
^समर्थ जॉगिंग ट्रॅक परिसरातील नागरिक व जॉगर्सचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ते ट्रॅकवर येत असले तरी ट्रॅकची दुरवस्था बघता कचरा, अस्वच्छता, स्वच्छतागृहाची सफाई होत नसल्याने दुर्गंधीने आरोग्यच धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने या समस्यांची दखल घेऊन त्याचे निराकरण करावे. - प्रा. डॉ. वर्षा अनिल भालेराव, माजी नगरसेविका
ट्रॅकवर ‘या’ समस्यांचे व्हावे निराकारण {मनपाने लाखो रुपये खर्चून बसविलेली अद्ययावत “म्युझिक सिस्टीम” अनेक महिन्यांपासून बंद असून ती सुरू करावी. {ट्रॅकच्या भोवताली भरपूर कचरा साचलेला आहे, तो तत्काळ उचलला जावा. कचरा उचलण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा असावी. {ट्रॅकच्या कोपऱ्यात नागरिकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता व्हावी. स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. {या स्वच्छतागृहाच्या किमान एक किलोमीटर परिघामध्ये मनपाचे स्वच्छतागृह नसल्याने या स्वच्छतागृहाचा वापर मोठया प्रमाणात होत असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.