आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा:नाशिक जिल्ह्यातून 37 हजार 571 मुलांची नोंदणी; 31 डिसेंबर अर्जाची शेवटची तारीख

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाते. 12 फेब्रुवारी 2023 ला होणाऱ्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून 37 हजार 571 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत. नियमित शुल्कासह शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तर विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेस पाचवीचे 23.90 टक्के तर आठवीचे 12.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात पाचवीसाठी 20 हजार 922 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 446 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर आठवीसाठी 17 हजार 564 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 403 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. एकूण 38 हजार 486 पैकी 35 हजार 848 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला उपस्थित होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाचवीच्या अर्ज संख्येत वाढ झाली आहेत. अर्जासाठी अजून संधी असल्याने यंदाच्या वर्षी दोन्ही परीक्षांना प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होईल, अशी शक्यता शिक्षण विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला असून त्यानंतर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदतही संपली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता अंतिम निकाल व गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. इयत्ता पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरवर्षी 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता आठवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वार्षिक 1500 रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जातात.

अशी झाली नोंदणी

इयत्ता पाचवी- 21,200

इयत्ता आठवी- 16371

कोविडनंतर यंदा वाढली विद्यार्थी संख्या

शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये कोविडच्या अगोदर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला नाशिकसह राज्यभरात ९ लाख 72 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यानंतर मात्र, कोविडमुळे दोन वर्ष शाळा बंद होत्या. या दोन वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेले. शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती न मिळाल्याने तब्बल अडीच लाखांनी विद्यार्थी संख्या कमी झाली.

2022 मध्ये 7 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोविडनंतर आता पुन्हा एकदा कमी झालेली पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांच्यासह शिक्षक व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. पाचवी व आठवीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती देऊन प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...