आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Pothole ridden Nashik Competes For Views; On Behalf Of The CPI, The Organization Of The Competition, The Campaign Of Signatures Will Be Carried Out Throughout The City| Marathi News

दिव्य मराठी विशेष:खड्डेग्रस्त नाशिकच्या देखाव्यांसाठी अनाेखी स्पर्धा; भाकपच्या वतीने स्पर्धेचे आयाेजन,शहरभर राबविणार सह्यांची माेहीम

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘स्मार्ट खड्डे कविसंमेलन’ पार पडल्यानंतर आता पुन्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गणेशाेत्सवांना ‘खड्डेग्रस्त नाशिकचे’ देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात येऊन तशी स्पर्धाच आयाेजित केल्याचे पक्षाचे राज्य सचिव काॅ. राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पावसामुळे आणि गॅस लाइनच्या कामामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे लहान-माेठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मनपा आयुक्तांनी कराराप्रमाणे खड्डे भरून न देणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला खरा, पण महापालिकेच्या बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा कोण करणार? असा सवाल भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला पक्षाचे राज्य काैन्सिल सदस्य महादेव खुडे, तल्हा शेख, दत्तू तुपे, विराज देवांग, भीमा पाटील, पद्माकर इंगळे, डाॅ. रामदास भोंग, कैलास मोरे, राहुल अढांगळे, प्राजक्ता कापडणे, सुरेश गायकवाड पदाधिकारी उपस्थित हाेते.

अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा
भाकपतर्फे खड्डेप्रश्नी आंदोलनाला करत आहाेत. ठेकेदार व काही नगरसेवकांमुळे जनतेच्या कराचा पैसा खड्ड्यात गेला आहे. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांचे, ठेकेदारांचे लक्ष वेधण्यासाठी या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. या संदर्भात संपूर्ण शहरात सह्यांची मोहीम राबवून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येत आहे.
राजू देसले, राज्य सचिव, भाकप

अशी हाेणार देखावा आणि पाेस्टर स्पर्धा
गणेश जयंतीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खड्डेग्रस्त नाशिककरांची व्यथा देखाव्यांच्या स्वरूपात मांडावी यासाठी गणेशोत्सव सजावट स्पर्धा व फोटो पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये, तृतीय २ हजार रुपये व सर्व सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर फोटो-पोस्टर स्पर्धेसाठीही अशीच पारिताेषिके आहेत. फोटो पोस्टर स्पर्धेत सहभागी नागरिकांनी तल्हा शेख, आयटक कामगार केंद्र, मेघदूत कॉम्प्लेक्स, सीबीएस, नाशिक सदर पत्त्यावर पाठवावेत. तसेच दोन्ही स्पर्धांसाठी नोंदणी करण्याकरिता ९४२११७६४८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. गणेश मंडळांच्या देखाव्यांतून शहरातील खड्डे दाखविताना त्याच्या अनुषंगाने निर्माण हाेणारे प्रश्नही दिसणे गरजेचे आहेत. त्यातून उपहासाबराेबरच उद्बाेधन हाेण्याचा प्रयत्नही दाखविणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...