आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी पाहणी करत असतानाच अपघात:खंडेरावनगरला खड्डेमय रस्ता ; अपघाताला निमंत्रण

इंदिरानगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडवलेणी परिसरातील खंडेरावनगरलगत नवीन पाच हजार लोकवस्तीचा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने येथून ये-जा करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावर पालिकेचे अधिकारी पाहणी करत असताना एक गर्भवती महिला दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे.

स्थानिकांनी याबाबत केलेल्या तक्रारींकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. पांडवलेणी डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी लगतच्या सदनिकेतून पाइपने रस्त्यावर साेडले जात असल्याने रस्ते खड्डेमय झाले आहे. येथील रहिवासी पालिकेचे सर्व कर नियमित भरत असूनही मूलभूत सोयी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करावे, अशी मागणी प्रवीण धांडे, ओमप्रकाश शर्मा आदींनी केली आहे.

लवकरच कांॅक्रिटीकरण
पावसाळ्यात पांडवलेणी डोंगरांवरील पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे या भागातील रस्ते लवकर खराब होत आहे. पालिकेकडून रस्ता दुरुस्तीची कार्यवाही सुरू असून तरतूद प्राप्त झाल्यानंतर काँक्रिटीकरण केले जाईल.
हेमंत पठे, उपअभियंता, महापालिका

तक्रारींकडे दुर्लक्ष...
रस्ते खराब झाल्यानंतर स्थानिकांकडून वारंवार ऑनलाइन व लेखी तक्रार केली जात आहे. मात्र, महापालिकेकडून यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कृष्णा पाटील, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...