आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज खंडित:दोन्ही एमआयडीसींमध्ये आज काही ठिकाणी वीज खंडित; देखभाल दुरुस्तीचे अंबडमध्ये पाच फीडरवर करणार काम

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींतील काही भागात शनिवारी (दि. १४) वीजपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीची कामे या काळात केली जाणार असल्याचे कारण यामागे असले तरी शनिवारी याकरिताच औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योगांना सुटी असते, त्यामुळे याचा विशेष परिणाम उद्योगांना जाणवणार नाही. अंबड औद्योगिक वसाहतीत ११ केव्ही गरवारे, ११ केव्ही हेल्डेक्स, ११ केव्ही अबेलीन, ११ केव्ही किम्प्लास या चार फीडरवर सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत वीजपुरवठा बंद असेल. तर ११ केव्ही गरवारे फीडरवर दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असेल.

अंबड औद्योगिक वसाहतीतील या पाच फीडरवर होत असलेल्या कामांमुळे वीजपुरवठा बंद राहिल्याचा परिणाम प्लाॅट नं. बी.के.पी.आय, एन.ए.-९ शॉप्स, प्लॉट नं डब्ल्यु १ ते डब्ल्यु ४१ किम्प्लास तसेच एल एक्स-५ ते एक्स १८, एक्स ३४ ते एक्स ३८ ए-१५ ते ए ४० या परिसरात दिसेल. सातपूर औद्योगिक वसाहतीत शेरीन ऑटो आणि महिंद्रा हरियाली परिसरातील वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद असेल. याचा परिणाम जयविक लेन, शान कार्स लेन, इंडियन टूल्स या परिसरात याचा परिणाम होईल.

बातम्या आणखी आहेत...