आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी हे सर्वात माेठे चाेर आहेत. पाकीस्तानच्या सीमेवर जाऊन युध्द करण्याची भाषा करणाऱ्या माेहन भागवत यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का हे अगाेदर त्यांनी जाहीर करावे. हे दाेघेही आराेपी आहेत.
यापुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, असे मी म्हणत नाही तर न्यायालयाने माेदींच्या वकीलांना सांगितलेले आहे. तुम्हाला जर या दाेघांनाही जेल मध्ये बघायचे असेल तर सत्ता बदलावी लागेल. त्यामुळे 2024 च्या निवडणूकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केलेे.
नाशिकच्या ईदगाह मैदानावर शनिवारी धम्म परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी आपल्या 48 मिनिटांच्या भाषणात त्यांनी संघ व पंतप्रधान माेदी यांच्यावर सडकुन टिका केली. सत्तेचा गैरवापर करत काेणत्याही पक्षाच्या प्रमुखांवर नेत्यांवर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या चाैकश्या लावण्यात आल्या आहेत. देशात पंतप्रधानांच्या ताेडीचा दुसरा माणूसच नाही असे बिंबवले जात आहे. आणि दुर्देवाने आपण सर्व त्याला बळी पडताे. आपल्याला पंतप्रधान नव्हे तर खासदार निवडून देण्याचा अधिकार आहे. आणि खासदारांना त्यांचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे.
तुमची पंतप्रधान होण्याची संधी नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मात्र ही व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांचे थेट पंतप्रधान निवडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हळू हळू आपला मेंदु ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला आहे. असे झाल्यास या देशात न्हावी, कुंभार, लाेहार, आदिवासी, काेळी, भटके कधीच पंतप्रधान हाेणार नाहीत. म्हणजेच तुमचा पंतप्रधान हाेण्याची संधी कायमची गेली. खासदारांची संधी काढून तुम्हाला कायमचे बंदीस्त केले जाईल असेही आंबेडकरांनी सांगितले. धम्म परिषदेस बाैध्द भिक्कुसह आंबेडकरांचे अनुयायी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
बंद करून दाखवा
चायनाला माेदी दादा समजतात. तुमची जर 56 इंच छाती आहे, तर चायना व अमेरीकेचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा. चायनाबाबत त्यांचे सैन्य पिटाळून लावल्याची खाेटी माहिती दिली जाते. संसदेत आपल्या खासदारांनी त्याबाबतचे प्रश्न विचारल्यास खरा मुद्दा सांगितला जात नाही.प्रत्यक्षात चायनाने आपली 2500 स्केअर फुट जागा ताब्यात घेतल्याचा गाैप्यस्फाेटही त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.