आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनस्थान आयकॉन पुरस्कार जाहीर:दीपक करंजीकर, प्रकाश होळकर, विनायक रानडे यांचा होणार गौरव

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जनस्थान' ग्रुपच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जनस्थान आयकॉन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा अभिनेते व लेखक दीपक करंजीकर, ग्रंथमित्र विनायक रानडे आणि कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना देण्यात येणार आहे. यावेळी कवी अशोक बागवे उपस्थित राहणार आहेत. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुरुवारी (23 जून) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वानंद बेदरकर, विनोद राठोड, अभय ओझरकर यांनी केले आहे.

दीपक करंजीकर यांनी भारतात आणि भारताबाहेर हे मराठी नाटक या विषयावर विशेष काम केले असून मराठी नाटकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा विविध भूमिका त्यांनी पार पडल्या आहेत. शासकीय-निमशासकीय अशा संस्थांवर महत्त्वाची पदे भूषविताना करंजीकर यांच्याकडून भारतीय पातळीवरील सांस्कृतिकचेही काम होत आहे. त्यांच्या याच कामाचा बहुमान म्हणून त्यांना यंदाचा आयकॉन पुरस्कार दिला जात आहे.

विनायक रानडे यांनी 'ग्रंथ तुमच्या दारी...' या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचन आणि वाचक चळवळीला देश आणि देशाच्या बाहेर अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचविले असून त्यांचे हे काम वाचनसंस्कृतीला बळ देणारे ठरले आहे. अतिशय वेगळी कल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी ग्रंथप्रसाराचे मोलाचे काम केले आहे.

प्रकाश होळकर यांचा 'कोरडे नक्षत्र' या कवितासंग्रहापासून सुरू झालेला प्रवास आजही सुरू आहे. चित्रपटगीते, अभ्यासक्रमात कविता याबरोबरच साहित्य-संस्कृती संस्थांमधील मानाची पदे ते आज भूषवित आहेत. ना धों महानोर यांच्यानंतर मराठी कवितेला एक वेगळा चेहरा देण्याचे श्रेय प्रकाश होळकर यांना जाते. त्यामुळे त्यांचाही जनस्थान आयकॉन पुरस्कार देऊन या सोहळ्यात सन्मान होईल.

कवी अशोक बागवे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
कवी अशोक बागवे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...