आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:ज्ञानदूत पुरस्काराने मानवधनचे प्रकाश कोल्हे यांचा सन्मान

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुका साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांना “ज्ञानदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे व इगतपुरी साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून कोल्हे यांचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य केले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान-अध्यात्म यांची सांगड घालत शैक्षणिक तसेच सामाजिक विकासातही त्यांचे कार्य सुरू आहे. साहित्यातही दर्जेदार लेखनातून समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या उत्तुंग कार्याचा आढावा घेऊन त्यांना ज्ञानदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...