आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयच्या शिबीरासाठी प्रतीक तिवारीची निवड:नाशिकच्या डावखुऱ्या फिरकीपटूची राष्ट्रीय शिबीरासाठी वर्णी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकचा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारीची 19 वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. 24 एप्रिल ते 18 मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि. व्हि. एस. लक्ष्मण प्रमुख असणारे एनसीए शिबीर बंगळुरूमध्ये होणार आहे. देशातील खेळाडूंसाठी हे शिबीर होणार आहे.

भेदक गोलंदाजी

प्रतीकने 19 वर्षांखालील नाशिक जिल्हा संघाचे राज्यस्तरीय प्रतिनिधित्व केले. यावेळी 19 वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( एम सी ए इन्विटेशन लीग ), अचूक व भेदक गोलंदाजीने गाजविली. प्रतीकने या स्पर्धेत 5 सामन्यात तब्बल 41 बळी मिळवले. त्याच्या जोरावर पाच साखळी सामन्यात 4 विजय मिळवत , नाशिक जिल्हा संघाने अ गट विजेतेपद पटकाविले होते .

स्थानिक क्रिकेटमध्येही 19 वर्षांखालील तसेच खुल्या गटात देखील प्रतीकच्या प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन होत असते. अंतिम संघ निवडीसाठी पुणे येथे झालेल्या संभाव्य संघातील सामन्यात देखील प्रतीकने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. वेळोवेळी केलेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत केलेल्या अशा लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच यंदा प्रतीक प्रभात तिवारीची 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली .

जाेरदार कामगिरी

प्रतीकने ऑक्टोबर 22 मध्ये एकदिवसीय विनू मंकड करंडक व डिसेंबर 22 मध्ये कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. विनू मंकड करंडक स्पर्धेतील सामन्यांत जोरदार कामगिरी करून उपांत्य फेरीपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत गोलंदाजीत प्रथम स्थान मिळवले. वेळोवेळी झालेल्या अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ आता प्रतीकची एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी निवड झाली निवड झाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...